चंद्रकांत कांबळेंचे मारेकरी अद्याप मोकाट

आरोपींना अटक न झाल्यास आरपीआयचा जन आंदोलनाचा इशारा

| वावोशी | वार्ताहर |

कोलाडमधील तीसे रेल्वे फाटकावर गेटमन म्हणून कर्तव्यावर असणाऱ्या आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते चंद्रकांत कांबळे यांची 21 ऑगस्ट रोजी अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेला एक आठवडा उलटून गेला असून, मारेकरी अद्याप मोकाटच आहेत. त्यामुळे आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड हे आक्रमक झाले असून, या दोन दिवसांत जर आरोपी अटक न झाल्यास रायगड जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा तीव्र इशारा जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी त्यांच्यासमवेत आरपीआयचे उपाध्यक्ष रविंद्र ओव्हाळ, सरचिटणीस एम. डी. कांबळे, युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक, रोहा तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, सुधागड तालुका अध्यक्ष राहुल सोनावणे, अलिबाग तालुका अध्यक्ष सुनील सप्रे, खालापूर तालुका कार्याध्यक्ष अशोक गोतरणे, जिल्हा युवक सचिव सुशील गायकवाड, सुधागड तालुका सचिव निशांत पवार, विनोद जोशी, भाई एल एन सताने, सुशांत भवार, सिद्धांत गायकवाड, जगदीश वाघमारे, सुदिन शिर्के आदी आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version