| कोलाड | प्रतिनिधी |
रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान यांचा 9 वा. वर्धापन दिन मंगळवारी (दि.9) रोहा येथील शासकीय विश्राम सभागृहात अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आंबेवाडी येथील प्रगत शेतकरी चंद्रकांत गणपत लोखंडे यांनी शेतीमध्ये चांगली प्रगती करून नावलौकिक प्राप्त केल्या बद्दल तसेच शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत लोखंडे यांना रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान तर्फे आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी कृषीरत्न अनिल पाटील, तालुका कृषी अधिकारी महादेव करे, कृषि विज्ञानकेंद्राचे डॉ. मनोज तलाठी, पंचायत समिती कृषी अधिकारी रंजित लवाटे, किरण लेले, कोंडू पाष्टे, गणेश भगत, अनंत मगर, प्रशांत धामणसे, रमेश पाटील, नितीन पिंपले, धनंजय जोशी, हसन म्हसलाई, खेळू थिटे, भाऊ डिके, विनोद पाटील, संतोष दिवेकर, रतिश मगर, किशोर मोरे, रघुनाथ कडू, पांडुरंग भेरे, रामचंद्र म्हात्रे, दगडू बामुगडे, गोपीनाथ गंभे यांच्या उपस्थितीत चंद्रकांत लोखंडे यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल चंद्रकांत लोखंडे यांचे विविध स्थरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.







