। पाली/बेणसे । वार्ताहर ।
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठणमधील एका कार्यक्रमात त्यांनी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले, या वक्तव्याचे आता जिल्ह्यातही तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. ऑल इंडिया पँथर सेना सुधागड व रायगड यांच्या वतीने तहसील कार्यालय पाली सुधागड व पाली पोलीस स्टेशन येथे महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणार्या चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले. यावेळी ऑल इंडिया पँथर सेना रायगड जिल्हा अध्यक्ष नरेश गायकवाड, नितीन यादव, संदेश भालेराव, मारुती गायकवाड, सुरज शिंदे, आवेश भालेराव, अशोक शिंदे, सुमित शिंदे उपस्थित होते.