| अहमदनगर | प्रतिनिधी |
पत्रकारांना चहा पाजयला न्या. या वक्तव्याबाबतची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची संभाषणाची क्लिप समोर आली आहे. त्यामुळे बावनकुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सारवासारव केली आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहायला हवं. विशेषतः पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना ढाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात महाविजय 2024 विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बुथरचना आणि पदाधिकाऱ्यांनी सांभाळायच्या जबाबदाऱ्या या विषयावर बावनकुळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल आहे. माध्यमांना बैठकीला परवानगी नसल्याने व्हिडीओ उपलब्ध होऊ शकला नाही, मात्र या संवादाच्या क्लिपमुळे पत्रकारांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.







