चांद्रयान पाचव्या कक्षेत दाखल

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-3 चे 14 जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. सध्या हे चांद्रयान पृथ्वीभोवती कक्षेमध्ये फिरत आहे. पृथ्वीभोवती पाच फेऱ्या मारल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने ढकलण्यात येईल. मंगळवारी या चांद्रयानाला चौथ्या कक्षेतून पाचव्या कक्षेत यशस्वीपणे ढकलण्यात आलं.

पाचव्या कक्षेत ढकलण्यात आल्यानंतर काही वेळातच हे चांद्रयान पृथ्वीपासून 1,27,609 किलोमीटर बाय 236 किलोमीटरच्या कक्षेत पोहोचेल. सध्या या यानाची स्थिती उत्तम असून, त्याची रेडियस काही चाचण्यांनंतर निश्चित सांगण्यात येईल. इस्रोने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

यानंतर 1 ऑगस्ट रोजी हे चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू करेल. यावेळी इस्रोकडून चांद्रयान-3 ला शेवटचा पुश देण्यात येईल. या टप्प्याला ट्रान्सलुनार इंजेक्शन असं म्हटलं जातं. 1 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 ते 1 वाजेदरम्यान ही क्रिया पार पडेल.

Exit mobile version