। श्रीहरीकोटी । वृत्तसंस्था ।
इस्त्रोच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान 3 प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यासाठी महत्त्वाचा भाग रॉकेट लाँचरसोबत जोडण्यात आला आहे. चांद्रयान-3 श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये रॉकेटशी जोडलं गेलं आहे. याचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण जुलै महिन्याच्या मध्यात होईल, असं इस्रोचे अध्यक्ष एस.सोमनाथ यांनी सांगितलं होतं. त्यानुसार, 13 ते 19 जुलै दरम्यान चांद्रयान 3 प्रक्षेपित करण्यात येण्याची शक्यता आहे.