| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चोंढी-किहीम येथील लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गुरुवार, दि. 6 जुलै रोजी ‘वाणिज्य व अर्थशास्त्र’ विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘आर्थिक जागृती कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम दोन सत्रांमध्ये पार पडला.
प्रथम सत्रामध्ये पदवी प्राप्त झाल्यानंतर नोकरीच्या संधी मिळतात त्यावेळेस मुलाखतीला कसे सामोरे जावे? यासाठी संकेत नाईक (CEO of DigiTrekkers Techsoluation Pvt. Ltd.) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे आजच्यातरुण पिढीला उद्योजकतेचे महत्त्व पटवून दिले.
द्वितीय सत्रामध्ये प्रज्ञा शिरधनकर (Practicing Chartered Accountant) यांनी कराच्यासंदर्भातील विविध कोर्सेसची माहिती दिली. यामध्ये TDS, GST व Income Tax यांसारख्या कोर्सेसबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. विद्या धसाडे तसेच अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. चिंतन पोतदार यांनी केले होते. ‘आर्थिक जागृती कार्यक्रम’ यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रवीण ठाकूर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, कार्यवाह रवींद्र ठाकूर, महाविद्यालयाच्या प्र. प्रा. लिना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रा. श्रद्धा पाटील यांच्यासह अन्य प्राध्यापकवर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चिंतन पोतदार तसेच प्रास्ताविक प्रा. विद्या धसाडे यांनी, तर आभारप्रदर्शन प्रा. तृप्ती खोत यांनी केले.