माणगावमधून चांद्रयानाचे प्रक्षेपण

विद्यार्थ्यांच्या कलाकृतीनी पालक भारावले

| माणगाव | प्रतिनिधी |

मुगवली येथील प्रख्यात लीड स्कूल शाळेने दरवर्षी प्रमाणे यंदाचे वर्षीही आपली स्टुडंट्स लीड कॉन्फरन्स नुकतीच आयोजित केली होती. यावेळी अखंड भारताचे नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या चंद्र यान – 3 ची प्रतिकृती लीडस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कागद पुठ्ठ्यां पासून तयार केलेली साकारली एवढेच नव्हे तर त्याची चाचणी ही करून दाखवली. विद्यार्थ्यांच्या या नाविन्यपूर्ण प्रतिकृतीचे उपस्थित पालक, शिक्षक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले असून अभिमानाने त्यांच्या भुवया आता उंचावल्या आहेत.

नुकतीच भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली. हा क्षण प्रत्येक भारतीयाने साजरा करायलाच हवा हे लक्षात घेऊन शाळेच्या इयत्ता 8 वी आणि 9 वीच्या विद्यार्थ्यांनी मिळून चंद्रयान 3 ची मोठी अशी चलचित्र स्वरूपात प्रतिकृती बनवून आपल्या देश्याच्या या महान कार्याला आणि देशातील महान शास्त्रज्ञाना मानवंदना दिली. ही चांद्रयान 3 ची प्रतिकृती बनवायला 8 ते 10 दिवस लागले. सदर प्रतिकृती कागदी पुठ्ठ्यांपासून बनविण्यात आली आणि स्टुडंट्स लीड कॉन्फरन्सच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आली. शाळेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांनी शाळेचे उपाध्यक्ष पालक वर्ग विद्यार्थी या सर्वांनी कौतुक केले. येणाऱ्या सर्वांना चंद्रयान -3 बद्दल सखोल माहिती देत विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वज हातात घेऊन देशाच्या या कार्याला सलाम केला.

हा सर्व उपक्रम निर्विघ्न पार पाडण्यात शाळेचे उपाध्यक्ष नितीन जिंदल, मुख्याध्यपिका सोनिया थॉमस, शैक्षणिक समन्वयक मीनल मलये, सायन्स शिक्षिका प्राची लोखंडे, कला शिक्षक सचिन गुप्ता व इयत्ता 8 वी आणि 9 वी वर्गातील विद्यार्थी या सर्वांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version