ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या कार्यकारिणीत फेरबदल

। कोर्लई । वार्ताहर ।
रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या जिल्हा कार्यकारनी सभा रोहा तालुक्यातील कोलाड (आंबेवाडी) ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हाध्यक्ष मंगेश म्हात्रे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.कोरोना रोगाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या अटि शर्ती व नियमांचे पालन करण्यात येऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन सभेला सुरुवात करण्यात आली.यावेळी तालुक्यातील अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेतला तसेच डिसेंबरमध्ये गोंदिया येथे होणार्‍या राज्य अधिवेशन बाबत चर्चा विचार विनिमय करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले. यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष चव्हाण, गोविंद म्हात्रे यांची तर प्रसिध्दी प्रमुखपदी संतोष मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Exit mobile version