। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे ग्रामपंचायतीचे वसुली कारकून जगदीश मधुकर चौलकर यांची रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या कार्यकारीणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची बैठक वाकण येथील गावदेवी मंदिरात संपन्न झाली. त्यावेळी जगदिश चौलकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मंगेश म्हात्रे, उपाध्यक्ष संतोष चव्हाण, गोविंद म्हात्रे, सचिव रमेश तांडेल, कार्यकारिणी सदस्य विकास पाटील, विठोबा धुमाळ, गणेश मोरे, प्रकाश पडवळ, संतोष मोरे, प्रदिप मिणमिणे, अतुल गायकर आदी उपस्थित होते.