। माथेरान । वार्ताहर ।
शासनाकडून दिल्या जाणार्या विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनास येथील प्राथमिक शाळेत अचानक माथेरान महसूल विभागाचे अधीक्षक दिक्षांत देशपांडे यांनी पाहणी केली.येथे पावसाळ्यात आलेले धान्य,स्वयंपाकघर या सर्व बाबींचा आढावा घेतला.
माथेरानमधील वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेत पहिली ते सातवी पर्यंत एकूण 180विद्यार्थी शिकत आहेत.यामध्ये काही आदिवासी विद्यार्थी सुद्धा आहेत.या सर्व विद्यार्थ्यांना शासनाकडून दिले जाणारे मध्यान्ह भोजन हे कसे दिले जाते याची खातरजमा करण्यासाठी माथेरान मधील महसूल विभागाचे अधिक्षक दिक्षांत देशपांडे यांनी सोमवारी 4 जुलै रोजी कोणतीही पूर्व सूचना न करता शाळेच्या मधल्या सुट्टीत अचानक भेट दिली. विद्यार्थ्यांना जेवण वाटप सुरू असताना अधिक्षक दिक्षांत देशपांडे,वरिष्ठ लिपिक मनोहर गोरेगावकर,अक्षय जाधव हे तिथे हजर झाले.यावेळी त्यांनी स्वयंपाक घराची पाहणी केली. येथे असलेली स्वच्छता आणि टापटीपपणा याची पाहणी केली. धान्य ठेवलेल्या डब्यातील धान्य पाहिले व इथे काम करणार्या महिला कर्मचार्यांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले आणि इतकेच नव्हे तर चक्क लहानग्यासोबत बसून विद्यार्थ्यांसाठी बनविलेले जेवण सुद्धा जेवले.