| कोलाड | प्रतिनिधी |
आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मंगळवारी (दि 2) जून रोजी आपत्ती व्यवस्थापन नियोजनासाठी सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत आंबेवाडी बाजारपेठेत पावसाळ्यात दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते, तसेच कालव्याच्या पाण्यामुळे असंख्य घरांमध्ये पाणी शिरते. या सर्वांचे नियोजन करण्यासाठी हायवेचे अधिकारी, पाटबंधारे खात्याचे अधिकारी वर्ग व ग्रामस्थयांची सभा घेण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने गोदी नदीच्या पाण्यामुळे संजय गांधी नगरमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते तसेच मुंबई-गोवा हायवेच्या निस्कृष्ठ दर्जाच्या कामामुळे या बाजारपेठेतील व्यावसायिकांच्या दुकानात तसेच रहिवासी नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान होत आहे. तसेच डोंगर माथ्यावरुन येणारे पाणी कालव्यात न जाता तो ओवर फ्लो होऊन आंबेवाडी येथील गणेश नगरमधील घरांमध्ये शिरत असल्यामुळे येथील नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. या संबंधित उपाययोजना करण्यासाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी,तसेच हायवेचे अधिकारी यांना या सभेला उपस्थित राहण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. यासंदर्भात पाटबंधारे खात्याचे अधिकारी उपस्थित राहून आमच्या मार्फत उपाय योजना केल्या जातील तसेच कुठल्याही आपत्तीसाठी सर्व यंत्रणा सज्ज राहील असे सांगण्यात आले. परंतु मुंबई-गोवा हायवेचे अधिकारी सभेचे निवेदन देऊन उपस्थित राहिले नाही याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.
यावेळी आंबवडी ग्रामपंचायत प्रशासक रणजीत लवटे, ग्रामसेवक राजेंद्र पाटील, पाटबंधारे विभागाचे दिसले, तलाठी रोहित, चंद्रकांत लोखंडे, कुमार लोखंडे, संजय कुर्ले अविनाश पलंगे, तसेच असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.





