चाणजे सरपंच थळी यांचा राजीनामा

। उरण । प्रतिनिधी ।
चाणजे ग्रामपंचायत शिवसेनेचे सरपंच मंगेश थळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा 1 वर्षे पूर्ण होण्याच्याआधीच राजीनामा दिल्याने शिवसेनेत नाराजीचा सूर निघत आहे. निवडणुकीला वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच सरपंच पदाचा राजीनामा देण्याची नामुष्की मंगेश थळी यांच्यावर ओढवली आहे. विशेष म्हणजे सरपंच मंगेश थळी यांनी राजीनामा दिल्याची माहिती ना शिवसेनेच्या नेतेमंडळीना, ना शिवसैनिकांना माहिती, बातमी वाचल्यानंतरच राजीनामा दिल्याचे माहिती पडले आहे. चाणजे सरपंच मंगेश थळी यांनी अचानक राजीनामा दिला. याची माहिती शिवसेनेच्या नेतेमंडळी व स्थानिक शिवसैनिकांनाही नव्हती. त्यामुळे त्यांच्यातही नाराजी असून त्यांनी राजीनामा का दिलात याची विचारणा केल्याचे समजते.

Exit mobile version