| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चिरनेर महागणपती क्षेत्रात माघी गणेश जयंती निमित्ताने मंगळवारी (दि.13) लाखो भाविकांनी प्राचीन जागृत श्री महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. रात्री एक वाजताच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी श्री महागणपतीचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्रींच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत भक्तीमय वातावरणात श्रींचे दर्शन घेतले.
श्रींच्या दर्शनासाठी मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उरण, पनवेल, पेण तसेच, राज्याच्या अनेक भागातून, आलेल्या लाखो भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. भक्तगणांची गैरसोय होऊ नये, सर्वांना सुखकर सोयी सुविधा मिळून, रांगेत दर्शन घेता यावे, वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी चिरनेर गणपती देवस्थान प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते.
चिरनेर गावात मंगलमूर्ती मोरयाचा गजर
