चरणजित सिंग चन्नी पंजाबच्या मुख्यमंत्री

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
चरणजित सिंग चन्नी यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना शपथ दिली. राजभवनात हा शपथग्रहण सोहळा सुरू आहे. चन्नी यांच्या व्यतिरिक्त पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी काँग्रेस नेते सुखजिंदर सिंग रंधावा यांना मंत्री पदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित आहेत. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी चन्नी यांना शपथ घेतल्यानंतर भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.शनिवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर चरणजित सिंग चन्नी यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा करण्यात आली. रविवारी दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं. चन्नी हे पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री झाले आहेत.

Exit mobile version