शार्लोट लेक अद्याप गाळात

गाळ न काढल्याने पालिकेविरोधात उपोषणाचा इशारा

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ब्रिटिशांनी शार्लोट लेक बांधला होता. त्या तलावातील गाळ काढण्यात यावे यासाठी निसर्ग पर्यटन संस्थेचे संतोष कदम यांनी उपोषण सुरु केले होते. त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर निविदा काढून शार्लोट लेक तलावातील गाळ काढण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. 15 जुलैपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून आणि शार्लोट लेकमधील गाळ काढण्याचे कार्यवाही पूर्ण झाली नाही. मात्र, माथेरान पालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरु केली असून, 29 जुलै रोजी टेंडर काढले जाणार आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात शार्लोट लेकमधील काढला जाणार काय, असा संशय उपोषणकर्ते संतोष कदम यांनी उपस्थित केला आहे.

माथेरान शहरात पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या शार्लोट लेकमधील पाण्याची साठवण क्षमता जंगलातील गाळ, माती वाहून आल्याने कमी झाली आहे. 2013 मध्ये या तलावातील गाळ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून 2000 श्री सदस्यांनी श्रमदान करून काढला होता. त्यानंतर एक तप पूर्ण झाले असून, अनेक वर्षे शार्लोट लेकमधील गाळ काढण्याची मागणी होत आहे. त्यासाठी तलावावर सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम यांनी उपोषणदेखील केले होते. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि माथेरान नगरपरिषदेकडून त्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही आणि त्यामुळे माथेरानमधील निसर्ग पर्यटन संस्थेने उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. शार्लोट तलावामध्ये अंदाजे 10 ते 15 फूट इतका गाळ आहे. तो गाळ काढण्यात यावा यासाठी माथेरान निसर्ग पर्यटन संस्थेचे अध्यक्ष संतोष कदम यांनी आतापर्यंत दोनवेळा उपोषणे केली आहेत. 21 जूनपासून करण्यात आलेल्या उपोषणाच्या वेळी माथेरान नगरपरिषदेकडून शार्लोट लेक मधील गाळ काढण्याचे काम निवडणूक आचारसंहिता असल्याने आचारसंहिता संपल्यावर निविदा काढण्यात येईल असे जाहीर आश्‍वासन दिले होते.

15 जुलै ही डेडलाईन संपली असून, पालिकेने अद्याप शहरातील शार्लोट तलावातील गाळ काढण्यासाठी निविदा काढून ठेकेदार नेमले नाहीत. त्यामुळे शार्लोट लेकमधील गाळ काढण्याचे काम झालेले नाही. पालिकेने शार्लोट लेकमधील गाळ काढण्याच्या कामासाठी एक कोटीचा निधी दिला आहे. पालिकेने आता निविदा काढली आहे, त्या निवेदची अंतिम तारीख 29 जुलै रोजी आहे. त्यामुळे त्या दिवशी निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि टेंडर कोणाला मिळाले हे नक्की होईल. मात्र, त्यानंतर शार्लोट लेकमधील गाळ काढण्याची शक्यता आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी याच शार्लोट लेकमधील गाळ काढण्याचे काम जुलै महिन्यात काढण्यास नवी मुंबई महानगरपालिका यांनी विरोध केला होता. त्यामुळे त्यावेळी शार्लोट लेकमधील पाणी सोडून गाळ काढण्यात आला नव्हता. त्यामुळे आता यावर्षी देखील निविदा काढली तरी शार्लोट लेकमधील गाळ काढण्याची शक्यता नाही. त्यामुळे उपोषण करणार्‍या संतोष कदम यांची पालिकेने फसवणूक केली असल्याचे स्पष्ट होते आहे. त्यामुळे संतोष कदम यांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून, 29 जुलै रोजी संतोष कदम हे आपले 22 जून रोजी स्थगित केलेलं उपोषण पुन्हा सुरु करणार आहेत.

Exit mobile version