लाडक्या बहिणींची हेळसांड

। कोलाड । वार्ताहर ।
राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी योजना अंमलात आणली. या योजने अंतर्गत दरमहा महिलांच्या बँक खात्यात काही महिलांच्या खात्यात दोन महिन्याचा हप्त्ता जमा झाला आहे. परंतु, अजून ही कोलाड खांब परिसरातील असंख्य सर्वसाधारण लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. तसेच, महाराष्ट्र बँकेत दहा बारा दिवस झाले तरी आधार कार्ड लिंक होत नाही. यासाठी बँकेत फेर्‍या मारून बहिणींची हेळसांड होताना दिसत आहे.

कोलाड खांब परिसरातील महिला या अतिशय दुर्गम भागात राहणार्‍या आहेत. या महिलांना बाजापेठेच्या ठिकाणी असलेल्या बँकेत आपले पैसे जमा झाले कि नाही हे पाहण्यासाठी 20 ते 25 किलोमीटर अंतरावरून पायपीट करावी लागते. यातच बँकेत येऊन तासंतास रांगेत उभे राहून वाट देखील पाहावी लागत आहे. यासाठी बँकेत आधार कार्ड देऊन ही दहा बारा दिवस लिंक होत नाही. यामुळे दोन दिवसावर गणपती उत्सव आले तरी असंख्य लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही.

Exit mobile version