| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध चौल-भोवाळे येथील पर्वतनिवासी दत्तगुरुंच्या यात्रेला शनिवारपासून (दि. 14) प्रारंभ होणार आहे. पाच दिवस भरणारी ही यात्रा बुधवारपर्यंत असणार आहे. यात्रेनिमित्त चौल परिसर गजबजला असून, राज्यभरातून विक्रेते याठिकाणी आले आहेत. मेवा मिठाईसह मनोरंजनासाठी आकाश पाळणे, टोराटोरा आदी याठिकाणी उपब्लध असणार आहे. अलिबाग बस स्थानकातून पुढील पाच दिवस भोवाळे यात्रा स्पेशल एसटी बसेस ठराविक वेळेत सोडण्यात येणार आहेत, त्यामुळे यात्रेकरुंची गैरसोय टळणार आहे. त्याचप्रमाणे चौल ग्रा.पं. प्रशासक आणि रेवदंडा पोलीस ठाण्याच्यावतीने चोख व्यवस्था व बंदोबस्त करण्यात येणार आहे. या यात्रेतून पुढील पाच दिवस मोठी आर्थिक उलाढाल पाहायला मिळणार आहे.