| माणगाव | प्रतिनिधी |
जयपूर येथे होणाऱ्या ‘इंटर्नल व्हाईस ऑफ डॉक्टर्स’ स्पर्धा 2024 साठी माणगाव येथील सुप्रसिद्ध सर्जन डॉ. सचिन जगन्नाथ चव्हाण यांची झोनल कोऑर्डिनेटर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. चव्हाण यांची उपरोक्त स्पर्धेकरीता नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
जयपूर येथे होणारी हि स्पर्धा जागतिक पातळीवर होत असून या स्पर्धेत परदेशातूनही अनेक स्पर्धक सहभागी होत असतात. हि स्पर्धा फक्त डॉक्टरांसाठीच असते. या स्पर्धेकरिता माणगाव येथील सुप्रसिद्ध सर्जन डॉ. सचिन चव्हाण यांची साऊथ आणि महाराष्ट्राकरीता नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी जयपूर येथे पार पडलेल्या ऑल इंडिया म्युझिक स्पर्धेत डॉ. सचिन चव्हाण यांनी सहभाग घेऊन आपल्या समवेत सहा कलाकारांना घेऊन कव्वालिची वेशभूषा करून बहारदार कव्वालिचे सादरीकरण केले होते. या कव्वालीला उपस्थित कव्वाली प्रेमींनी दाद दिली होती. या सादर केलेल्या कव्वाली निमित्त डॉ. सचिन चव्हाण यांना जयपूर येथे इम्प्रेसिव्ह प्रेझेंटेशन उत्कृष्ट सादरीकरणाचे बक्षीस मिळाले होते.