पॅरिस ऑलिम्पिक 2024
| पॅरिस | वृत्तसंस्था |
खेळांचा महाकुंभ म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिक. दर चार वर्षांनी होणारी ही स्पर्धा क्रीडा विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. यामुळे या स्पर्धेत सहभागी होण्याचे स्पप्न प्रत्येत खेळाडू पाहातो. आता पॅरिसमध्ये यंदा ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 26 जुलै रोजी पार पडणार आहे. पण त्याआधी 24 जुलैपासूनच वेगवेगळ्या खेळांच्या प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारताचे एकूण 117 खेळाडू सहभागी होणार आहेत. एकूण 18 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत भारताचे खेळाडू 16 क्रीडा प्रकारांमध्ये खेळताना दिसणार आहेत. सर्वाधिक 29 खेळाडू ऍथलेटिक्समध्ये सहभागी होणार आहेत, त्यापाठोपाठ 21 खेळाडू नेमबाजीमध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान, या स्पर्धेत जुलै महिन्यातील भारतीयांचे सामने कधी आणि किती वाजता आहेत, त्या वेळापत्रकाचा अढावा घेतला आहे.
भारताचे ऑलिम्पिकचे वेळापत्रक जुलै
26 जुलै-
तिरंदाजी- महिला (दुपारी 1 वा.) आणि पुरुष (संध्या. 5.45 वा.), वैयक्तिक क्वालिफायर्स उद्घाटन सोहळा (रात्री 11.30 वा.)
27 जुलै-
नेमबाजी- 10 मी. एअर रायफल (दुपारी 2 वा.) (मेडलसाठीही लढत)
हॉकी- भारत विरुद्ध न्यूझीलंड (रात्री. 9 वा.)
बॅडमिंटन- सर्व प्रकारातील सामने (दुपारी 12.50 वा.)
बॉक्सिंग- प्रीती पवार (संध्या. 7 वा.)
रोईंग- पुरुष स्कल्स हिट (दुपारी 12.30 वा.
घोडेस्वारी- ड्रेसेज (दुपारी 1 वा.)
टेबल टेनिस- एकेरी (संध्या. 6.30 वा.)
टेनिस – पुरुष एकेरी पहिली फेरी (दुपारी 3.30 वा.)
28 जुलै-
नेमबाजी- 10 मी. एअर पिस्तुल पुरुष (दुपारी 1 वा.) आणि महिला (दुपारी 3.30 वा.)
तिरंदाजी- महिला सांघिक (दुपारी 1 वा.)
बॉक्सिंग- निखत झरिन (दुपारी 3.50 वा.) आणि निशांत देव (दुपारी 2.46 वा.)
बॅडमिंटन- सर्व प्रकारातील सामने (दुपारी 12 वा.)
रोईंग- पुरुष स्कल रेपेचेज (दुपारी 1.06 वा.)
टेबल टेनिस- एकेरी (दुपारी 3.30 वा.)
टेनिस- एकेरी आणि दुहेरी (दुपारी 3.30 वा.
जलतरण- पुरुष 100 मी. बॅकस्ट्रोक आणि महिला 200 मी. फ्रीस्टाईल (29 जुलै – रात्री 1.07 वाजता)
29 जुलै-
नेमबाजी- पुरुष ट्रॅप क्वालिफायर्स (दुपारी 12.30 वा.)
सांघिक पिस्तुल क्वालिफायर्स (दुपारी 12.45 वा.)
10 मीटर एअर रायफल महिला (दुपारी 1 वा.) आणि पुरुष (दुपारी 3 वा. (मेडल्ससाठीही लढत)
तिरंदाजी- पुरुष सांघिक (दुपारी 1 वा.)
हॉकी- भारत विरुद्ध अर्जेंटिना (दुपारी 4.15 वा.)
बॅडमिंटन- सर्व प्रकारांच्या लढती (दुपारी 1 वा.)
टेबल टेनिस- एकेरी (दुपारी 3.30 वा.)
रोईंग- पुरुष स्कल्स (दुपारी 1 वा.)
30 जुलै –
नेमबाजी- 10 मीटर एअर पिस्तुल मिश्र संघ (कांस्य पदकासाठी लढत (दुपारी 1 वा.), सुवर्णपदकासाठी लढत 1.30 वा.)
पुरुष ट्रॅप अंतिम फेरी (पदकासाठी लढती) (संध्या. 7 वा.)
महिला ट्रॅप क्वालिफायर्स हॉकी- भारत विरुद्ध आयर्लंड (दुपारी. 4.45 वा)
बॅडमिंटन- सर्व प्रकारांच्या लढती (दुपारी 12 वा.)
बॉक्सिंग- प्रीती पवार (दुपारी 3.50 वा.)
जास्मिन (दुपारी 4.38 वा.)
तिरंदाजी- महिला आणि पुरुष (दुपारी 3.30 वा.)
रोईंग- पुरुष स्कल्स उपांत्यपूर्व फेरी (दुपारी 1.40 वा.)
घोडेस्वारी- ड्रेसेज जीपी (दुपारी 2.30 वा.)
टेबल टेनिस- पुरुष आणि महिला (दुपारी 1.30 वा.)
टेनिस- पुरुष आणि दुहेरी (दुपारी 3.30 वा)
31 जुलै-
नेमबाजी- ट्रॅप महिला अंतिम फेरी (पदकासाठी लढती) (संध्या. 7 वा)
पुरुष 50 मीटर 3 पोझिशन्स क्वालिफायर्स बॅडमिंटन- सर्व प्रकारांच्या लढती (दुपारी 12 वा.)
बॉक्सिंग- लवलिना बोर्गोहेन (दुपारी 3.34 वा.), निशांत देव (संध्या. 7.48 वा.)
टेबल टेनिस- महिला आणि पुरुष (दुपारी 1.30 वा.)
घोडेस्वारी- ड्रेसेज ग्रँड प्रिक्स (दुपारी 1.30 वा.
टेनिस- एकेरी तिसरी फेरी आणि दुहेरी उपांत्य फेरी (दुपारी 3.30 वा.)