| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारत कठिण परिस्थितीत असताना मैदानात येऊन जडेजाने (89) कर्णधार शुभमन गिलसोबत महत्त्वपूर्ण 203 धावांची भागी केली. याचसोबत त्याने जागतीक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 2000 धावांचा टप्पा पार केला. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 2000 धावा करणारा आणि 100 हून अधिक विकेट घेणारा रविंद्र जडेजा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 2000 धावांचा टप्पा पार केला. जडेजाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत 41 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 40 च्या सरासरीने 2010 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने आपल्या गोलंदाजीची जादू सुद्धा वेळोवेळी दाखवून दिली आहे. त्याच्या नावावर 132 विकेट आहे. त्याने आतापर्यंत 6 वेळा पाच विकेट घेण्याचा आणि 6 वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.