चव्हाणांचे मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य

। मुंबई । प्रतिनिधी ।

लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यातील मतदान पार पडले. आता पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. महाविकास आघाडी लोकसभेच्या निवडणुकीसारखे मोठे आवाहन विधानसभेच्या निवडणुकीमध्येही देण्याच्या तयारीत आहे. मात्र, येणार्‍या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण असेल? यासंदर्भात महाविकास आघाडीत बर्‍याच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत.

यावर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा फार्म्युला कसा असेल? याबाबत भाष्य केले आहे. यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा सर्वात मोठ्या पक्षाचा म्हणजे ज्या पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त असते त्या पक्षाचा होतो. जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आले तर त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. आतापर्यंत आमच्यामध्ये म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर लढत होतो तेव्हा ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होत होता. आताही ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असा फार्म्युला असेल. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीआधी आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवणार नाहीत. त्यानंतर ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Exit mobile version