पती-पत्नीला सव्वा दोन लाखांचा गंडा

। पनवेल । वार्ताहर ।

रिफंड अमाऊंट परत न करता पती-पत्नीच्या खात्यामधून 2 लाख 27 हजार डेबिट करून फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी इसमाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिटघर येथे राहणाऱ्या विना प्रियोळकर यांचे पती रायू प्रियोळकर हे सेंट्रल रेल्वे मुंबई येथे नोकरी करतात. त्यांनी जिओ मार्टवर ग्राइंडर खरेदी केले होते. ग्राइंडरचे सर्व पार्ट्स आले नसल्याने त्यांनी ग्राइंडर रद्द करून परत रिफंड मिळण्याची रिक्वेस्ट पाठवली. मात्र ग्राइंडर परत घेण्यास व पैसे परत देण्यास कोणी आले नाही. त्यामुळे त्यांनी गुगलवर कस्टमर केअरचा नंबर सर्च केला. त्यावेळी कॉल केला असता तुषार सिंघम नावाचे इसम बोलत असल्याचे सांगितले. यावेळी त्या इसमाने गुगल पे चालू करण्यास सांगितले व एनी डेस्क ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावेळी मोबाईल क्रमांकाचे पहिले पाच अंक टाकण्यास सांगितले. तरीही पैसे परत आले नाहीत. त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा कॉल करून पैसे आले नसल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी दुसरा खाते क्रमांक मागितला. त्यांनी पतीचा खाते क्रमांक संलग्न असलेला मोबाईल नंबर दिला. पती यांच्या मोबाईलवर देखील एनी डेस्क ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले व प्रोसिजर करण्यास सांगितली. त्यांनी मोबाईल क्रमांकाचे शेवटचे पाच अंक गुगल पे वर टाकण्यास सांगितले असता त्यांनी ते टाकले. यावेळी पतीच्या खात्यातून 97 हजार 34 रुपये डेबिट झाले. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर थोड्या वेळाने 98 हजार 339 आणि 31 हजार 997 रुपये डेबिट झाले. जिओ मार्टची रिफंड करणाऱ्या कस्टमर केअरमधून बोलणाऱ्या इसमाने 2 लाख 27 हजार 370 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version