| पनवेल | वार्ताहर |
खारघर येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या एका अधिकार्याला फोनवरून फसवणूक केल्याची घटना खारघरमध्ये घडली आहे.
खारघर येथील सेक्टर 35 मध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची वसाहत आहे. या वसाहतीमध्ये राहणार्या एका अधिकार्याने संबंधित फसवणुकीची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. एका मोबाइल फोनवरून आलेल्या संदेशाची पडताळणी करताना एका केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे महासंचालक यांचा फोटो व्हॉट्सअॅपवरील डीपीवर ठेवून त्यांची ओळख वापरल्याने ही तक्रार नोंदविण्यात आली आहे. संबंधित अनोळखी व्यक्तीने स्वतःची खरी ओळख न सांगता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे महानिदेशक यांच्या ओळखीने फोनवरील व्यक्तीला तुम्ही कसे आहात असे विचारून त्यांची ओळख करून घेत होता. त्यामुळे इतर अधिकार्यांनी या फोनवरील व्यक्तीचा शोध काढल्यावर त्याला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे महासंचालक हे ओळखत नसल्याचे समोर आले. त्यामुळे याप्रकरणी खारघर येथे राहणार्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या अधिकार्याने पोलिसांत गुन्हा नोंदविला आहे.







