लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |

प्रेमसंबंध जोडून लग्न करतो असे सांगून एका महिलेबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याप्रकरणी एका इसमाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पनवेल येथील मोसिन मुजावर (36) याने एका 29 वर्षीय महिलेबरोबर ओळख करून तिच्यासोबत प्रेमसंबंध जोडून लग्न करतो असे सांगून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेवून तिच्यावर वारंवार जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याप्रकरणी पिडीत महिलेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने मोसीनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version