| नवी मुंबई | प्रतिनिधी |
अखिल भारतीय कोळी समाज, नवी दिल्ली या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य युवा प्रदेशाध्यक्षपदी चेतन रमेशदादा पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चेतन पाटील गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील आदिवासी कोळी बांधवांसाठी व कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांसाठी निस्वार्थपणे काम करीत आहेत. कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य भाजपा मच्छिमार सेलचे अध्यक्ष म्हणून ते आदिवासी कोळी व मच्छीमार समाजाचे प्रश्न शासन स्तरावर सोडवून समाजातील सर्व बांधवांची व भगिनींची उन्नती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांचे संघटनात्मक कार्य व समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या धडपडीमुळे अखिल भारतीय कोळी समाज, नवी दिल्ली या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष कुंवरजीभाई बावलिया यांनी महाराष्ट्र राज्याचे युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. गेल्या काही वर्षापासून कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील आदिवासी कोळी व मच्छीमार बांधवांच्या उत्कर्षासाठी व प्रगतीसाठी प्रामाणिक काम करत आहेत.
या नियुक्तीनंतर पुढील काळात समाज बांधवांचा विकास करण्याची जबाबदारी आणखी वाढली आहे. आदिवासी कोळी बांधवांना जातीचे दाखले देणे, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच आदिवासी कोळी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून यापुढे समाज बांधवांचा सामाजिक, आर्थिक व राजकीय विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
चेतन पाटील, प्रदेशाध्यक्ष