चेतेश्वर पुजाराचा धमाका, रणजीत झळकावले द्विशतक

| राजकोट | वृत्तसंस्था |

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र, आता रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावून चेतेश्वर पुजाराने पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत अप्रतिम द्विशतक झळकात विजय हजारे या विक्रम मोडला. विशेष म्हणजे त्याची ही मोठी खेळी अशा वेळी आली आहे, जेव्हा भारतीय निवड समितीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करायची आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची आज (7 जानेवारी) संध्याकाळपर्यंत घोषणा होऊ शकते. याआधीच चेतेश्वर पुजाराच्या रणजीतील द्विशतकाने निवडकर्त्यांना त्याच्या निवडीबद्दल विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पुजाराने हा पराक्रम केला आहे. झारखंडविरुद्धच्या या सामन्यात सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच दिवशी सौराष्ट्रच्या गोलंदाजांनी झारखंडला 142 धावांत गुंडाळले. यानंतर सौराष्ट्रने सुरुवातीपासूनच दमदार फलंदाजी केली. हार्विक देसाई (85), शेल्डन जॅक्सन (54) आणि अर्पित वसावडा (68) यांनी अर्धशतके झळकावली. त्यानंतर सौराष्ट्राने आपला पहिला डाव 158 षटकानंतर 4 बाद 578 धावसंख्येवर घोषित केला आणि पहिल्या डावाच्या जोरावर 420 धावांची आघाडी घेतली.

सौराष्ट्राने आपला पहिला डाव घोषित केला, तेव्हा प्रेरक मंकडने आणि चेतेश्वर पुजार खेळपट्टीवर नाबाद होते. प्रेरक मंकडनेही येथे शतक झळकावले. त्याने 176 चेंडूचा सामना करताना 12 चौकारांच्या मदतीने नाबाद 104 धावा केल्या. त्याचबरोबर चेतेश्वर पुजारानेही द्विशतक झळकावले. त्याने 356 चेंडूचा सामना करताना 30 चौकारांच्या मदतीने नाबाद 243 धावा केल्या. त्याने या शतकाच्या जोरावर विजय हजारे यांचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील विक्रम मोडला.

Exit mobile version