नेरळ | वार्ताहर |
कर्जत शहरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे संभाजी महाराज यांची जयंती 14 मे रोजी कर्जत शहरातील मुद्रे नाना मास्तर नगर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे करण्यात आली. यावेळी महाराजांना अभिवादन करण्यासाठीं शेकडो तरुण आणि शिवप्रेमी उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर सर्व शिवप्रेमी हे रेल्वे स्टेशन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी बाईक रॅली काठण्यात आली. कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर दहिवली येथे असलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौक येथे प्रतिमा पूजन करून छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश लाड, माजी नगरसेवक कृष्ण घाडगे, ज्ञानेश्वर भालिवडे, राजेश लाड, अनिल भोसले, बाळू तवले, शंकर थोरवे, रोहिदास लोभी, भगवान धुळे, राजु बांदल, विशाल माळी, तिर्थेश शिंदे, शाकिब खान, धनंजय ठाकरे, श्रीकांत आगिवले आदी मान्यवर उपस्थित होते.