वहाळ येथे छ. शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण

| उरण | वार्ताहर |

वहाळ येथील साई मंदिरात साई दर्शन भक्तीसोबत शक्तीचे दर्शन घडावे या उद्देशाने आज गुढी पाडव्याच्या शुभ दिनी हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाहुती पुतळा मंदिर परिसरात बसविला. पुतळ्याचे अनावरण आर. टी. ओ. सचिव विध्या सागर हिरमुखे व अन्न व औषध महाराष्ट्र सचिव संदीप पतंगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, नारायण शेठ घरत, काशिनाथ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या पार्वतीताई पाटील साई देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील, बाळाराम पाटील, जगन शेठ पाटील, अनंत पाटील, मो. का. मढवी, शिरीष कडू, रामकृष्ण महाराज, सुदिन पाटील, सुशील पाटील, धनंजय घरत, माजी सरपंच अरुण दापोलकर, तैमूर पाटील आदी सह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version