| उरण | वार्ताहर |
स्वामी समर्थांनी स्वतः 12 वर्ष वापरलेल्या चर्म चरणपादुका अक्कलकोट वरून वहाळ येथील साई मंदिरात भक्ताच्या दर्शनासाठी आणण्यात आल्या होत्या. यावेळी हजारो भक्तानी पादुकांचे दर्शन घेतले. श्री साई देवस्थान चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील यानी स्वामी पादुकांचे देवस्थानच्यावतीने भव्य स्वागत केले. पादुका घेऊन अभिषेक निकम, धनश्री माम्हुलकर आणि सोबत अभिनेता मयुरेश कोटकर आले होते. सोबत ईगामी स्वामी आजोबा सिनेमाची टीम आली होती. या सिनेमात स्वामी आजोबांची मध्यवर्ती भुमिका मयुरेश कोटकर यानी साकारली आहे.
श्री स्वामी समर्थ चरण पादुकांचे मंदिरात. श्री रवीशेठ पाटील. व श्री जगन शेठ पाटील.सौ. पार्वती ताई पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व भाविकांना दर्शना साठी खुल्या करण्यात आल्या यावेळी हजारो भाविकांनी स्वामींच्या चरण पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी अभिनेते मयुरेश कोटकर. अभिषेक निकम धनश्री माहुलकर.माजी सभापती नरेश घरत. जगनशेठ पाटील. शेकाप तालुका चिटणीस विकास नाईक यांचा यावेळी देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला होता. यावेळी रमाकांत पाटील. शिरीष कडू. मो. का. मढवी राजू मुंबईकर. श्रीकांत मुंबईकर. गायक नाना गडकरी. जगदीश पारिंगे. विश्वास पाटील. एकनाथ ठाकूर. खरे गुरुजी आदी सह स्वामी समर्थक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.