अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
किरकोळ कारणावरून अलिबागमधील पिवळी-काळी टॅक्सी चालकांमध्ये वाद झाला. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी जलिंदर नालकूल करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,अलिबाग एसटी बस स्थानकाच्या कॅन्टीन समोरील जागेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय येथे सोमवारी(दि.17)सायंकाळी फिर्यादी महेंद्र खंडागळे हे वाद सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी महेंद्र खंडागळे यांना तिघांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळी केली. याप्रकरणी अलिबाग पोलीस प्रशांत पाटील, सुयेश चेरकर आणि आकाश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. अलिबाग एसटी स्थानकाच्या समोर असलेल्या काळी पिवळी टॅक्सी चालकांमध्ये काही कारणामुळे वाद झाला.हा वाद विकोपाला पोहचला आहे.







