मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आढावा बैठकीत घेतली झाडाझडती

। उरण । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी नुकतीच उरणमध्ये ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत ग्रामसेवकांची झाडाझडती घेऊन शासनाचा येणारा निधी त्याच कामांसाठी वापरून स्पर्धेत ग्रामपंचायत कशी पुढे येईल याकडे पाहणे आवश्यक असल्याचे सूतोवाच केले.
उरण तालुक्यातील पंचायत समिती व ग्रामपंचायतचा कारभार वादाच्या भोवर्यात सापडत चालला आहे. शासनाकडून 14, 15 व्या वित्तायोगाचा तसेच इतर कामांचा कोट्यवधी निधी येत असतो. त्या निधीमधून ग्रामपंचायतचा विकास करावयाचा असतो. मात्र उरणमध्ये होणार्‍या कामांचा दर्जा निकृष्ट दर्जाचा असतो यावर नियंत्रण ठेवणारी स्थानिक प्रशासन आर्थिक हितसंबंधातून त्यांना पाठीशी घालीत आहेत. याबाबत अधिकृत चौकशीची किंवा माहितीच्या अधिकारात माहिती मागूनही टाळाटाळ केली जात असल्याचे दिसते.


मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेवकांना उपदेशाची लस टोचली आहे. त्याचा परिणाम विकास कामांसाठी होणे आवश्यक आहे. पाणीपट्टी, घरपट्टी याचा सॉफ्टवेअर जेणेकरून ऑनलाइन भरता येईल. येणारा शासकीय निधी हा त्याच कामांसाठी वापरणे बंधनकारक आहे. निविदा ही येथील वृत्तपत्रात प्रसिद्ध होणे आवश्यक आहे. प्रसिद्ध होणार्या निविदेवर ज्यांच्या सह्या असणे त्या बंधनकारक आहेत. सदस्यांना कामे वाटप करावीत. पुरस्कार मिळो ना मिळो चांगले काम करीत राहेवत. आपण अधिकारी असलो तरी पगार हा जनतेच्या पैशातून घेत असतो मिळणारा मान हा त्या खुर्चीचा आहे. यात कोणी हयगय केली तर त्याचा ठपका ग्रामसेवकावर येईल म्हणून कोणाच्या दबावाखाली काम न करता नियमाला धरून काम करण्याचा सल्ला यावेळी पाटील यांनी दिला. या बैठकीस सभापती समिधा म्हात्रे, उपसभापती शुभांगी पाटील, गटविकास अधिकारी नीलम गाडे, गटशिक्षणाधिकारी के. बी. अंजने, इतर अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक आदी उपस्थित होते. सदर बैठक समाज प्रबोधन शाळेत संपन्न झाली.

Exit mobile version