| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांनी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील एकशे पंचवीस शाळांमध्ये सदर उपक्रमाची माहिती देण्यात आली. आठहजार विद्यार्थ्यांना याबाबत शिक्षकांच्या माध्यमातून प्रेरित केले गेले. सदर शासकीय निर्णयांची तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत मार्गदर्शन आणि माहिती पोचविण्याचे महत्त्वाचे काम गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांनी अधिक प्रभावी आणि तत्परतेने केल्याने विद्यार्थी, शिक्षकांसह पालकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले असून, शाळाशाळांमध्ये स्पर्धात्मक , पोषक आणि आश्वासक चित्र निर्माण झाले आहे.







