मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान

पालीत राजिप विभागातून तिवरे शाळा प्रथम

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सुधागड तालुक्यात रायगड जिल्हा परिषद विभागातून तिवरे तर खाजगी अनुदानित विभागातून श्री राज एज्युकेशन सेंटर घोटवडे शाळेस तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.

ही स्पर्धा जिल्हा परिषद शाळा व खाजगी अनुदानित शाळा अशा दोन विभागात घेण्यात आली. तालुक्यातील शाळांची तपासणी तालुकास्तरीय मूल्यमापन समितीने प्रत्येक उपक्रम निहाय करून मूल्यांकन केले. त्यामध्ये रायगड जिल्हा परिषद विभागातून तिवरे शाळेने बाजी मारून सुधागड तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. तर द्वितीय क्रमांक सिद्धेश्‍वर बुद्रुक तर तृतीय क्रमांक सागवाडी ही शाळा ठरली.खाजगी अनुदानित शाळा विभागातून श्री राज एज्युकेशन सेंटर घोटवडे प्रथम , अनुदानित आश्रमशाळा वावळोली द्वितीय तर आत्मोन्नती विद्यामंदिर जांभूळपाडा तृतीय क्रमांक मुख्यमंत्री माझी शाळा सूंदर शाळा टप्पा 2 या उपक्रमात पात्र ठरल्या.

Exit mobile version