| नागपूर | वृत्तसंस्था |
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराला आता वेग आला असून प्रचाराचे शेवटचे काही दिवस उरले आहेत. सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून गावोगावी जाऊन प्रचार करण्यात येतोय. नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते. भाजपच्या लोकसंवाद यात्रेत मुख्यमंत्री सहभागी झाले. तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी चक्क दुचाकीवरून प्रवास केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गाड्यांचा ताफाही बाजूला सोडला. पुन्हा दुकाचीवरूनच ते आपल्या गाड्यांचा ताफा होता तिथे गेले.
नागपूरमध्ये नितीन गडकरी यांनी लोकसंवाद यात्रा आयोजित केली होती. रविवारी रात्री या यात्रेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. दरम्यान, शहरात गर्दी असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ताफ्यातून उतरत भाजप पदाधिकाऱ्याच्या दुचाकीवरून गेले. त्यांनी दुचाकीवरून नितीन गडकरींचा प्रचाररथ गाठला. तिथून लोकसंवाद यात्रा जयतळ्याच्या दिशेने गेली.
नागपूरमध्ये वाहतूक कोंडी असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःचा ताफा आणि सुरक्षा यंत्रणा सोडून चक्क दुकाचीवरून प्रवास केला. भाजपच्या कार्यकर्त्याच्या दुचाकीवर बसून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचाररथापर्यंत ते पोहचले. त्यानंतर ते रॅलीत सहभागी होत महायुतीचे उमेदवार म्हणून गडकरी यांचा प्रचार केला. रॅली संपून परतीचा मार्गावरही त्यांनी अशाच पद्धतीने दुचाकीवरून प्रवास करत स्वतःच्या ताफ्यात सामील झाले. त्यानंतर रामगिरीच्या दिशेने रवाना झाले.