| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड जंजिरा नगरपरिषदेच्या वतीने मुख्यमंत्री वयोश्री व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन शिबिराचे आयोजन नगरपरिषद कार्यालयातील सभागृहात करण्यात आले होते.
यावेळी मुरुड जंजिरा नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी परेश कुंभार, नायब तहसीलदार संजय तवर, आरोग्य निरीक्षक राकेश पाटील, पाणीपुरवठा अधिकारी मनोज पुलेकर, अण्णा कंधारे, तलाठी रूपेश रेवसकर, प्रकाश आरेकर आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा 50 ज्येष्ठ नागरिकांचे ऑफलाईन पध्दतीने अर्ज भरण्यात आले, तर मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेकरिता दोन ज्येष्ठ नागरिकांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज भरण्यात आले आहे.
मुख्यमंत्री वयोश्री, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन शिबिराचे आयोजन
