चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश

तमिळनाडू । वृत्तसंस्था ।

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि इतर १३ जणांना घेऊन जाणारे लष्कराचे हेलिकॉप्टर काही वेळापूर्वी तामिळनाडूमध्ये कोसळले. पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर भाजल्याने रुग्णालयात दाखल आहेत. जनरल रावत यांच्या पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि भारतीय वायुसेनेचे कर्मचारी 14 जणांमध्ये होते.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ विमानात असल्याची पुष्टी भारतीय हवाई दलाने ट्विटमध्ये केली. आज त्यांनी दिल्लीहून सुलूरला विमान प्रवास केला होता. “सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह IAF Mi-17V5 हेलिकॉप्टरचा आज तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ अपघात झाला. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत” असे ट्विट केले आहे.

Exit mobile version