चिखली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

| भाकरवड | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील सरखेल कानोजी आंग्रे हायस्कूल चिखली एसएससी या 1974 बॅचचा पहिले गेट टुगेदर 50 वर्षांनी अनिल ठाकूर यांच्या नियोजनाखाली अशोका रिसॉर्ट, पोयनाड येथे संपन्न झाले. सर्वप्रथम देवाज्ञा झालेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी हरे राम हरे कृष्ण अशी प्रार्थना केली. हभप सुधीर महाराज पाटील यांनी प्रभू श्रीराम यांचे आत्मचित्र कीर्तनसेवेत प्रस्तुत केले. त्यानंतर सर्वांना गुलाब पुष्प, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. या गेट टुगेदरसाठी मुंबई, अलिबाग, पनवेल, पेण, काचली, पिटकिरी, सांबरी, नामदेवनगर, कुसुंबळे, हेमनगर, मेढेखार आदी गावांतून जवळ जवळ 45 हून अधिक 60, 65 वयोमान असणारे विद्यार्थी हजर होते.

दरम्यान, या बॅचचे शाळेतून शिकून गेलेले कुणी उद्योजक, समाजसेवक, इंजिनिअर्स, शिक्षक/शिक्षिका कंडक्टर, पोलीस अशा चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. दरम्यान, संगीत व इतर कार्यक्रमांंचे मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करून धमाल व मौजमस्तीतून आत्मियतेचे व सौहार्दाचे दर्शन दाखवून दिले. या कार्यक्रमांदरम्यान ग्रुपमधील मित्रांच्या आयुष्यातील विशेष उपलब्धींचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, कला, क्रीडा कार्यात सहभागी होऊन लोककल्याणकारी समाजसेवेबद्दल सर्वांचे ग्रुपतर्फे सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version