पनवेलमधून मुलाचे अपहरण

नवीन पनवेल | वार्ताहर |
खांदा कॉलनी बालग्राम महाराष्ट्र पंचायत संकुल, सेक्टर 12 या ठिकाणाहून बारा वर्षे अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालग्राम, महाराष्ट्र पंचदिप संकुल येथे अनाथ मुलांचे संगोपन करण्याचे काम शासनाच्या नियमावलीप्रमाणे करण्यात येते. आश्रमातील मुलांची शाळेत जाण्याची तयारी चालू असताना बारा वर्षीय मुलगा इतर मुलांसोबत खेळत होता. मात्र काही वेळानंतर तो मुलगा दिसून आला नाही. त्याचा शोध घेतला असता तो सापडून आला नाही. त्याचा रंग सावळा, उंची साडेतीन फूट, अंगाने मजबूत, नाक सरळ आहे. त्याच्या गळ्यात काळा दोरा असून अंगात राखाडी गर्द लाल आणि पिवळ्या रंगाचा फुल शर्ट आणि हाफ काळ्या रंगाचा बरमूडा घातलेला आहे. त्याला मराठी व हिंदी भाषा बोलता येते. या मुलाला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले आहे.

Exit mobile version