लाईट ऑफ लाईफ ट्रस्टतर्फे बाल कलाकार महोत्सव

। नेरळ । वार्ताहर ।
लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट तर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांना सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ निर्माण केले जाते. याचा एक भाग म्हणून कर्जत विभागात एकूण 8 केंद्रामध्ये यावर्षी महोत्सव घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यामध्ये एकूण 10 स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात निबंध स्पर्धा, चित्रकला वक्तृत्व स्पर्धा,काव्यवाचन स्पर्धा,वैयक्तिक गायन,समूह गायन स्पर्धा, वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य,रांगोळी स्पर्धा, प्रतिकृती स्पर्धा घेण्यात आल्या. निवड प्रक्रिया ही धापया मंदिर येथे आयोजित केली होती.तर बाल कला महोत्सव हा भिसेगाव येथील जय अंबे माता मंदिर येथे पार पाडला. परीक्षक कर्जत, खोपोली तसेच बदलापूर भागातून आलेले होते. सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक कांचन थोरवे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.

Exit mobile version