महिलेला वडखळ पोलिसांनी केली अटक
I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
तळ्यावर पोहण्यास गेलेल्या दोन मुलांमध्ये खेळण्यावरून भांडण झाले. त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या मुलाच्या आईने मुलाच्या मित्राला शिवीगाळ करीत कानाखाली मारल्या. याचा मनाला धक्का बसल्याने त्या मुलाने कंबरेच्या पट्ट्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पेण तालुक्यातील बोर्वे येथे घडली. याप्रकरणी वडखळ पोलिसांनी सदर महिले विरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.
25 ऑगस्ट रोजी सांयकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास बोर्वे तालुका पेण येथील आर्यन हा मुलगा गावातील तळयावर पोहण्यासाठी गेला होता. यावेळी खेळण्यावरून त्याचा गावातील मुलासोबत भांडण झाले. घरी आल्यानंतर त्याच्या आईने याबाबत जाब विचारण्यासाठी आर्यन याच्या दुकानात आली. त्यावेळी तिने आर्यन याला ये नलायका, मोरक्या असे बोलुन त्याच्या दोन कानाखाली मारल्या आणि शिविगाळी करीत निघुन गेली.
या अपमानास्पद गोष्टीमुळे आर्यन याने आपली गावात इज्जत गेली. त्यामुळे स्वतःच्या घराच्या माळयावर कमरेला लावण्याच्या पटट्राचे व दोरीच्या साहयाने गळफास लावुन आत्महत्या केली. त्यामुळे सदर महिलेने आर्यन याला आत्महत्या करण्यास प्रव़ुत्त केल्याबाबत पोलिसात नोंद करण्यात आली आहे.. सदर गुन्ह्यातील महिलेला 26 ऑगस्ट रोजी 3:41 वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. याबाबत वडखळ पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क.306 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक /श्री.मडके हे करीत आहेत.