दुर्दैवी घटना! कालव्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू

। सोलापूर । प्रतिनिधी ।

कामती खुर्द लमाण तांडा (ता. मोहोळ) येथील श्री परमेश्‍वर आश्रम शाळा इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणारा विराज विनोद राठोड (8) याचा उजनीच्या कालव्यात बुडून मृत्यू झाला.

विराज आपले आजोबा मल्लिनाथ कल्लू चव्हाण यांच्याकडे शिकायला होता. नेहमीप्रमाणे तो शाळा सुटल्यानंतर चिमुकल्या मित्रांसमवेत कॅनॉलमध्ये पोहायला गेला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने कालव्याच्या वाहत्या पाण्यात विराज राठोड व त्याचा मित्र साईराज राठोड हे दोघे वाहून जाऊ लागले. हे पाहून कॅनॉलवर असणार्‍या काही चिमुकल्यांनी आरडाओरड केली. त्यांची ही आरडाओरड ऐकून एका युवकाने तत्परता दाखवत साईराजला वाचवले. मात्र, विराजचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Exit mobile version