सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू

| पनवेल । वार्ताहर ।

बांधकाम व्यवसायिकाने इमारतीच्या सांडपाण्याच्या पाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून एका नऊ ते दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आकुर्ली घडली आहे. या घटनेची नोंद खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात करण्यात आली.

तिसरी इयत्तेत शिकणारा करणकुमार अजय प्रसाद मेहता झारखंड याचे कुटुंबीय आकुर्ली गावात राहतात. (दि.7 )एप्रिल रोजी करण कुमार हा खेळण्यासाठी मागे गेला होता. या ठिकाणी एका बांधकाम व्यावसायिकाच्या इमारतींचे काम सुरू आहे. या बांधकाम व्यवसायिकाने सांडपाण्याच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी अन्य जागेत मोठा खड्डा खोदला आहे. त्या खड्ड्यात बुडून करणकुमार याचा मृत्यू झाला. बांधकाम व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळे या मुलाचा मृत्यू झाला असे बोलले जात आहे. सांडपाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्याला संरक्षक जाळी लावली असती तर हा प्रकार घडला नसता. त्यामुळे या बांधकाम व्यावसायिकाविरोधात खांदेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.

Exit mobile version