| पनवेल | वार्ताहर |
चुन्याची डबी तोंडातून गिळल्याने आठवर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पनवेल शहरात घडली. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली. शिव अर्जुन शिंदे (रा. मालधक्का, पनवेल रेल्वे स्थानकाजवळ, पनवेल) याने तंबाखूच्या सोबत असलेल्या चुन्याची डबी गिळली. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात केली.
डबी गिळल्याने मुलाचा मृत्यू
