विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू

। पुणे । वृत्तसंस्था ।

वडगाव शेरीतील गणेशनगर भागात एक दुर्दैवी घटना घडली आहे. विजेच्या धक्का लागून एका दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

बुधवारी रात्री नऊच्या सुमारास मोहित आपल्या मित्रांसोबत घराजवळ खेळत असताना अचानक त्याचा हात अर्थिंगच्या वायरला लागला. वायरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने वीजेचा धक्का मोहितला बसून तो जागेवर कोसळला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Exit mobile version