विविध मैदानी खेळात रंगून गेले बाल गोपाळ

| खांब | वार्ताहर |

सध्या सर्व शाळा आणि कॉलेजना ऊन्हाळी सुट्टी पडली असून सुट्टीतील विरंगुळ्याचे साधन म्हणून बाल गोपाळ विविध मैदानी खेळात रंगून गेले असल्याचे दिसून येत आहे.

वर्षभराचा अभ्यासक्रम पुर्ण झाल्यावर व द्वितीय सत्राची परीक्षा संपताच बाल गोपाळांना ऊन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात येते. या सुट्टीत टिव्ही पाहणे, मोबाईलवर गेम्स खेळणे, नदी, तलाव, कालव्यामध्ये मनसोक्त पोहणे, विविध प्रकारचे छंद जोपासणे, मामाच्या गावाला जाणे यासारखे बेत बाल गोपाळ करीत असतात, परंतू या वर्षाच्या वाढत्या उष्णतेने सा-यांनाच हैराण परेशान करून सोडले आहे. अशावेळी बाल गोपाळ एकत्र येऊन सकाळी व सायंकाळच्या सुमारास एकत्र येऊन मैदानावर जाऊन मैदानी खेळ खेळण्यास प्राधान्य देत असून विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळण्यात बाल गोपाळ रंगून गेले आहेत. क्रिक्रेट खेळणे, विटीदांडू, गोट्या खेळणे, लपाछपी, आट्यापाट्या खेळणे आदी खेळ खेळण्याला प्राधान्य देऊन रंगून गेले आहेत. एरव्ही मोबाईलमध्ये तासनतास मान खुपसून राहणारी बच्चे कंपनी मैदानी खेळांकडे आकर्षित झाल्याने घरच्या मंडळींच्या चेह-यावरही हास्य फुलले आहे.

Exit mobile version