बालयुवक पेझारी अंतिम विजेता

। श्रीगांव । वार्ताहर ।

अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथे प्रगती क्रिडा मंडळ आयोजित पोयनाड-शहाबाज क्रिकेट असो.च्या मान्यतेने रविवारी (दि.22) ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या बालयुवक पेझारी संघाला 15 हजार रू. व द्वितीय क्रमांक पटकावलेल्या जय बजरंग घसवड संघाला 10 हजार रू. देण्यात आले. तर, तृतिय क्रमांक पटकावलेल्या जय गणेश आंबेवाडी व चतुर्थ क्रमांक पटकावलेल्या प्रगती श्रीगाव या संघाला प्रत्येकी 6 हजार रू. देण्यात आले आहेत. तसेच, सर्व विजेत्या संघाना आकर्षक चषक देण्यात आले आहेत.

तसेच, स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज प्रतीक (जय गणेश आंबेवाडी), उत्कृष्ट गोलंदाज प्रतीक पाटील (प्रगती श्रीगाव), सामनावीर निकेश पाटील (बालयुवक पेझारी), मालिकावीर अपंत्य (जय बजरंग घसवड) यांचा विशेष पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेचे उत्कृष्ट समालोचन निलेश पाटील यानी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रगती क्रिडा मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम केले.

Exit mobile version