। भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत पोयनाड हद्दीतील भाकरवड येथे सागरगड अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने रुपेश इलेव्हन भाकरवड संघाच्या माध्यमातून रविवारी (दि.28) क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्याचे उद्घाटन अनंत गोमा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केले. या सामन्यात भाकरवड पंचक्रोशीतील जवळपास 18 संघांनी सहभाग घेतला होता.
सागर गड अंडरआरार्म क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश पाटील भाकरवड व उपाध्यक्ष तुषार पाटील मेढेखार यांच्या अध्यक्षतेखाली या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यात प्रथम क्रमांक युनिक पेझारी, दृतीय क्रमांक एअर इंडिया तळाशेत, तृतीय क्रमांक रुपेश इलेव्हन भाकरवड, चतुर्थ क्रमांक श्री राम गांध्येपाडा तर सर्वात्कृष्ठ खेळाडू मितेश पाटील पेझारी, उत्कृष्ट फलंदाज राकेश वाघ तळाशेत, उत्कृष्ट गोलंदाज क्षितिज पाटील पेझारी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सिद्धेश पाटील भाकरवड यांना आंबेपुर ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील, महादेव पाटील, उदय पाटील, नरेंद्र पाटील, दत्तात्रेय पाटील, दिलीप पाटील यांच्या हस्ते बक्षिस वितरीत करण्यात आले
प्रथम क्रमांक 7 हजार एक रूपये, दृतीय 5 हजार एक रूपये नागेश मढवी यांनी तर तृतीय क्रमांक 3 हजार एक रूपये स्वप्नील पाटील, चतुर्थ क्रमांक 3 हजार एक रूपये उदय पाटील तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व सामनावीर चषक अमोल पाटील तर आकर्षक चषक रुपेश इलेव्हन संघाकडून देण्यात आल