। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पोषण अभियानांतर्गत बोर्ली ग्रामपंचायत सभागृहात बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच डॉ.चेतन जावसेन, सदस्या भारती बंदरी, ग्रामविकास अधिकारी पांडुरंग गाडेकर, आरोग्य सेविका संध्या भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी झालेल्या स्पर्धेत पाच वर्षांपर्यंत वयोगटातील बालकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रा.पं. सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले. उपस्थितांना जावसेन, संध्या भोईर यांनी मार्गदर्शन केले.