कोठिंबे शाळेत बालसभा उत्साहात

| नेरळ | प्रतिनिधी |

कशेळे येथील केंद्राच्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळा कोठिंबे येथील शाळेमध्ये विद्यार्थिनी यांनी बालसभा घेतली. सावित्रीबाई फुले यांच्या जयन्ती निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन कशेळे केंद्राच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन केले होते.

बालसभा मध्ये पायल मिलिंद डामसे हिने सूत्रसंचालन केले. बालसभेचे अध्यक्षस्थान नव्या नगरकर हिने भूषविले तर अंजली गायकवाड़ हिने अनुमोदन दिले. कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून उज्ज्वला पाटील यांनी मागदर्शन केले. यावेळी केंद्र प्रमुख अरुण पारधी, मुख्याध्यापक विजय जगताप, शबरी सेवा संस्थाचे दिलीप निमकर, अनिता जोशी, अर्पिता देसाई हे उपस्थित होते. शबरी सेवा संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजन करण्यात आल्या. त्यात मुलांमध्ये मानस हरि रायमांझी याने प्रथम क्रमांक, गौरव गणेश भगत याने द्वितीय, तर प्रवीण नरेश पादिर याने तृतीय पुरस्कार पटकाविला. तर मुलींमध्ये भूमिका नरेश पादिर हिने प्रथम, पायल मिलिंद डामसे हिने द्वितीय, सान्वी संजय डोके हिने तृतीय पुरस्कार पटकाविला.

यावेळी विजेत्या स्पर्धकाना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आले. अपिनाथ थैल, देवीदास पाटील, उपशिक्षक रीना ऐनकर, शिवकुमार पाटील, बालाजी चौसष्ते, शंकर थोटे यांनी नियोजन केले होते.

Exit mobile version